कळवण – अभोणा येथे मंडल आयोग व राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापना दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.जिल्हाध्यक्ष सौ.स्वाती वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ओबीसी तालुकाध्यक्ष सौ.दिपाली बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे सरस्वतीपुजन व दिपप्रज्वलन सौं बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी कळवण तालुक्याची कार्यकारणी यावेळी निवडण्यात येऊन तालुका उपाध्यक्षपदी सौ. सुनिता येवला यांची निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा मुसळे यांनी करुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कळवण तालुक्याची कार्यकारिणी सौ.मेघा जगताप यांनी सादर केली.तालुकाध्यक्ष सौं दिपाली बच्छाव यांनी मंडल आयोग दिनाचे महत्त्व आणि ओबीसी आरक्षण म्हणजे काय हे स्पष्ट केले. कार्यक्रमास लताताई महाले,हर्षदा चव्हाण,जयश्री सोनवणे,ललिता गुंजाळ, विजया जाधव,सुवर्णा पवार,सुजाता बागुल,चंदा पवार,सोनाली खैरनार यांच्यासह अनेक महिला भगिनी यांची उपस्थिती होती.सुनिता येवला व स्नेहल मुसळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन करुन कार्यक्रमास उपस्थिती मान्यवरांचे आभार मानले.