कळवण – आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी चालली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्यामुळे व्यसनापासून मुक्त होण्याचा निर्धार आदिवासी बांधवानी आदिवासी दिनानिमित्ताने करण्याची गरज असल्याचे सांगून कळवण तालुक्यातील जी गावे दारुमुक्त आणि तंबाखू मुक्त होतील त्या गावांना ग्रामविकासासाठी १५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी निमपाडा येथे आयोजित कार्यक्रमात दिली. निमपाडा, प्रतापनगर, सुपले दिगर, काठरे दिगर या भागात जागतिक अदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार नितीन पवार व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कळवण तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसल्याने वादळीवाऱ्यामुळे घरांच्या नुकसानीसह शेती, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले.
कळवण तालुक्यातील ११३ घराच्या नुकसान भरपाई पोटी १६ लाख ९५ हजार रुपये तर २ शेतकऱ्यांच्या १.८० हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाच्या नुकसान भरपाईपोटी ९० हजार रुपये असे १७ लाख ८५ हजार रुपये शासनस्तरावरुन मंजूर करण्यात आमदार नितीन पवार यांना यश आले. आदिवासी दिन व क्रांती दिन निमित्ताने सुपले दिगर येथे आयोजित कार्यक्रमात सयाजी बहिरम, शिवाजी गायकवाड, वेणूबाई बर्डे, अनिल गायकवाड या लाभार्थीना प्रतिनिधित्व स्वरुपात आर्थिक मदतीचा धनादेश आमदार नितीन पवार, ऋषिकेश पवार यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी तहसीलदार बी ए कापसे, माजी सभापती लालाजी जाधव, ऋषिकेश पवार,रघुनाथ जाधव, रघु महाजन आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.