कळवण तालुक्यात विकास कामांचा लोकार्पण सोहळा
कळवण – कोरोना प्रादुर्भाव काळात आपल्या सर्वाना भेटता आले नाही मात्र कळवण सुरगाणा तालुक्यातील मंजूर कामे सुरु करण्याच्या सूचना यंत्रणेला केल्याने आज बहुतांशी कामे पूर्ण झाली, काही कामे सुरु आहेत तर काही गावांना कामाचा प्रारंभ केला त्यावेळी गावोगावी नागरिक भेटले, त्यांनी निवेदने दिली. त्या प्रत्येक निवेदनाला महत्व असून जे कामे करणे शक्य आहे ती मी नक्कीच करणार, केवळ आश्वासन देऊन वेळ मारुन नेणार नाही अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.
कळवण तालुक्यातील ९३ कोटी ७० लाख रुपयांच्या मंजूर कामातर्गत नवीबेज, जुनीबेज, बगडू,ककाणे, देसराणे, इन्शी, खेडगाव बारीपाडा,विसापूर, बिजोरे,मोकभणगी, रवळजीं, गणोरे, पाळे, एकलहरे, गोसराने येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून देविदास पवार, यादवराव पवार,धनंजय पवार,अशोक पवार, राजेंद्र भामरे,कृष्णा बच्छाव, हेमंत पाटील,दशरथ बच्छाव, काकाजी बच्छाव, विलास रौंदळ शितलकुमार अहिरे,संतोष देशमुख, सुरेश देवरे, बाळकृष्ण पाटील, कैलास चव्हाण, देवा पाटील, संदीप वाघ, महेंद्र हिरे, बाजीराव गुंजाळ, विष्णू बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार नितीन पवार यांनी पुढे सांगितले की
शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मतदार संघात गेल्या दोन वर्षात सर्वाधिक निधी मंजूर करण्यात यश आले. अर्थसंकल्प, नाबार्ड, आदिवासी उपयोजना, ठक्कर बाप्पा, रस्ते व पूल दुरुस्ती, डोंगरी विकास, जनसुविधा, मूलभूत योजना व आमदार निधी या वेगवेगळ्या योजनामधून कामे मंजूर करण्यात यश आले त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामे उभी करणे हेच आपले धोरण आहे अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.
यावेळी नवीबेज, जुनीबेज, ककाणे, मोकभणगी, रवळजीं येथे गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, सिडकोवस्ती, आदिवासी वस्ती रस्ता करणे, नवीबेज बगडु पिळकोस रस्ता बांधकाम करणे, जुनीबेज येथे सभामंडप बांधकाम करणे ,जुनी बेज, ककाणे, देसराणे, इन्शी, खेडगाव येथे हायमास्ट व पथदीप बसविणे विसापूर येथे बारीपाडा,विसापूर ( बिजोरे )मोकभणगी पेव्हरब्लॉक बसविणे,ककाणे ते ककाणेपाडा रस्ता बांधकाम व रस्ता काँक्रीटीकरण करणे,मोकभणगी ते देसराणे रस्ता सुधारणा करणे गणोरे- मोकभणगी रस्ता करणे, हुंड्यामोख नळ पाणीपुरवठा योजना, देसराणे येथे संरक्षक भिंत बांधणे,इन्शी ते इन्शीफाटा रस्ता करणे, रवळजीपैकी आदिवासी पाडा कृष्णमंदिर गावांतर्गत रस्ता करणे , खेडगांव हरिजनवस्ती रस्ता करणे,खेडगाव येथे संरक्षक भिंत बांधणे , खेडगाव येथील श्रीक्षेत्र गणेश मंदिर परिसर सुशोभिकरण करणे , एकलहरे फाटा ते पाटविहिर रस्ता करणे ,पाळे खु येथे मोरी बांधकाम करणे , पाळे बु . कळमधे रस्ता करणे, गोसराणे बार्डे रस्ता करणे आदी कामांचा शुभारंभ, लोकार्पण करण्यात आले.
यावेळी विनोद खैरनार,चंद्रकांत पवार, घनश्याम पवार,बाजीराव खैरनार,नरेंद्र वाघ, कैलास पाटील, संजय पवार, संजय बच्छाव, संदीप पाटील, रामा पाटील, नरेंद्र चव्हाण, प्रल्हाद गुंजाळ, विनोद जाधव आदी उपस्थित होते.