तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामे हेच माझे ध्येय – आमदार नितीन पवार
कळवण – स्व. ए टी पवार यांनी विकासकामांची शिकवण दिली आहे त्यामुळे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मतदार संघात निधी मंजूर करण्यात यश आले. अर्थसंकल्प, नाबार्ड, आदिवासी उपयोजना, ठक्कर बाप्पा, रस्ते व पूल दुरुस्ती, डोंगरी विकास, जनसुविधा, मूलभूत योजना व आमदार निधी या वेगवेगळ्या योजनामधून ९३ कोटी ७० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात यश आले त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामे करणे हेच माझे ध्येय आहे अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.
कळवण तालुक्यातील ९३ कोटी ७० लाख रुपयांच्या मंजूर कामातर्गत दरेगाव वणी, चिखली, कळवण खुर्द, मानूर, जिरवाडे, शिरसमणी, ओतूर, भुसणी, निवाणे, भेंडी, कळवण येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गटनेते यशवंत गवळी, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जेष्ठ नेते रविंद्र देवरे, उपसभापती विजय शिरसाठ, भूषण पगार,हेमंत पाटील, संतोष देशमुख,शिवाजी चौरे, अतुल देवरे, विलास रौंदळ, सुनील देवरे आदी होते.
यावेळी आमदार पवार यांनी पुढे सांगितले की निवडणुकीत जो शब्द दिला तो पाळला , तुम्ही जे कामे सांगितले ती पूर्ण केली, ओतूर धरणाचा प्रश्न देखील अंतिम टप्प्यात असून या परिसरातील पाणी प्रश्न सोडविणे हा मी दिलेला शब्द पूर्ण करेल अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी दरेगाव वणी, चिखलीपाडा येथे सभामंडप बांधकाम करणे,साकोरेपाडा येथे संरक्षक भित बांधकाम करणे , कोल्हापूर फाटा ते कळवण खु . रस्त्याचे बांधकाम करणे,कोल्हापूर फाटा येथे पाणीपुरवठा करणे,साकोरेपाडा ते जीरवाडे रस्ता बांधकाम करणे,शिरसमणी सावळदरा सटवाईवाडी रस्त्याचे बांधकाम करणे,शिरसमणी व कुंडाणे, ओतूर, भुसणी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, ओतूर मोरेवस्ती रस्ता बांधकाम करणे, कळवण खुर्द येथील रस्ता बांधकाम करणे, आदिवासी वस्तीमध्ये नळपाणी पुरवठा योजना करणे, निवाणे ते मुलुकवाडी व आहेरवस्ती रस्ता बांधकाम करणे,जुनी भेंडी ते वरवडी रस्ता बांधकाम करणे,भेंडी येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, जुनी भेडी रस्ता बांधकाम करणे भेंडी फाटा ते देवरे वस्ती रस्ता बांधकाम करणे, संगमेश्वर मंदिर रामनगर येथे संरक्षक भिंत बांधकाम करणे,कळवण येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा करण्यात आला.
कार्यक्रमास ,नामदेव खैरनार, बळीराम देवरे, रविकांत सोनवणे, प्रकाश राऊत, जिभाऊ वाघ, बापू सावकार, दिगंबर पवार, बी एन पगार, परशुराम शिंदे, बाजीराव शिंदे, केदा सोनवणे, नितीन वाघ, हिरामण वाघ,सागर खैरनार,आदी उपस्थित होते.