कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन…
कळवण -गेल्या पाच वर्षात कळवण शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरुन विविध योजनेच्या माध्यमातून कोट्याधीश रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने शहरात झालेला बदल दिसून येतो. गटनेते कौतिक पगार यांच्यासारखे सक्षम नेतृत्व कळवण नगरपंचायतला लाभल्याने शहराचा चौफेरे विकास झाला. लोकप्रतिनिधी या नात्याने कळवण शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून तेच अंतिम ध्येय आहे त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.
आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून कळवण नगरपंचायतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार होते.प्रमुख अतिथी म्हणून कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे,माजी सरपंच सुनील जैन,नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार ,बाळासाहेब जाधव , समता परिषद तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल,युवा नेते भूषण पगार,राजेंद्र पगार,हरीचंद्र पगार,गौरव पगार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी उपस्थित होते.
आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरातील १७ प्रभागात ५५ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून नागरिकांच्या मागणीनुसार सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण रस्ते विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. आज मोठादेव नाला रस्त्याचे मजबुतीकरण,डॉ.सम्राट पवार हॉस्पिटल ते महावितरण कार्यालय दरम्यान वाहतुकीसाठी पुल ,बायोगॅस प्रकल्प,अप्पा बुटे यांचे घर ते आठवडे बाजारपर्यंत पाईप गटार व रस्ता व बेहडी नदीपात्रातील सिमेंट बंधारा या विकासकामांचे भूमिपूजन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कळवण शहरातील प्रस्तावित विकासकामासाठी १७ कोटी रुपये मंजूर झाले असून शहरातील सर्वच प्रभागातील विकासकामे करण्यात गेल्या ५ वर्षात आपल्याला यश आले.जनतेच्या साक्षीने शहरात विकासकामे पूर्ण केली त्यामुळे विकासकामे कोण करु शकतो हे कळवणकरांना समजून चुकले आहे .त्यामुळे कळवणकरांनी भविष्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत अशीच साथ द्यावी असे आवाहन यावेळी गटनेते कौतिक पगार यांनी यावेळी नागरिकांशी बोलतांना केले. याप्रसंगी धनंजय पवार,देविदास पवार,राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी सुभाष राजाराम पगार,दिनकर पगार,देवराम पगार,रिंकू पगार, डॉ.सम्राट पवार,प्रतीक देवरे,बापूसाहेब खैरनार,जयराम पगार,रमेश पगार,अमोल मुर्तडक,रमेश शेवाळे, बापू पगार,अभिलाष पगार,किरण पगार,राम पगार,मुन्ना भामरे,गणेश भामरे,विजय काकुळते,डॉ. दीपक शेवाळे,लक्ष्मण पगार,भाऊसाहेब अहिरे,संदीप पगार,शाम खैरनार अमोल पगार,अप्पा बुटे,राजेंद्र पगार,पांडुरंग शिवदे,दत्तात्रेय गायकवाड,रंजन देवरे,रवी मोरे,भास्कर मोरे,बबलू मोरे,सचिन शिवदे,गणेश अहिरे उपस्थित होते.