कळवण – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन कळवण शहरात उत्साहात साजरा करण्यात येऊन एस टी बस स्थानक परिसरातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे छावा क्रांतिवीर संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप पगार, कळवण तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रमोद रौंदळ, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक देवरे, अशोक शेवाळे, रामदास वाघ, प्रविण पाटील, पंकज निकम, सप्तर्षी शेवाळे, जयराम पगार, कृष्णा पगार, टिनू पगार, चेतन पगार, प्रसाद निकम, ललित पगार, गार्गी पगार यांनी प्रतिमापूजन करुन विनम्रपणे नतमस्तक होऊन अभिवादन केले.
यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा कोरोना महामारीमुळे शासनाच्या नियमावलीमुळे मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थित साजरा करावा लागला आहे. मात्र यापुढे हा सोहळा एक सण उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येईल असे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रमोद रौंदळ यांनी यावेळी सांगितले.