कळवण – कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कळवण, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते.शासनस्तरावर तिसरी लाट येणार या पार्श्वभूमीवर नियोजन केले जात असून बाल रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे हे लक्षात घेऊन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीने उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरला ६ ऑक्सिजन मीटर देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
आमदार नितीन पवार यांच्या हस्ते कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर प्रमुख डॉ प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे ६ ऑक्सिजन मीटर सुपूर्द करण्यात आले.
यावेळी बोलतांना आमदार नितीन पवार यांनी सांगितले की,सध्या कोरोना प्रतिबंधासाठी विविध संस्था वेगवेगळ्या माध्यमातून पुढाकार घेत असून कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून आरोग्य विभाग नियोजन करीत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सहा ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देऊन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील संस्था, संघटना यांना कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देऊन कोरोना रुग्णांची ऑक्सिजनसाठी होत असलेली परवड लक्षात घेऊन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळवण कोविड केअर सेंटरला सहा ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले असून
त्याचा रुग्णांना निश्चित लाभ होईल, असा आशावाद बाजार समितीचे सभापती धंनजय पवार यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी कळवणचे तहसीलदार बी ए कापसे, कोरोना केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ , प्रल्हाद चव्हाण, डॉ.संजय बंगाळ, बाजार समिती उपसभापती शोभा निकम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, बाजार समिती संचालक विष्णू बोरसे,डी.एम.गायकवाड,ज्ञानदेव पवार, सुनिल देवरे, साहेबराव पाटील,हेमंत बोरसे, बाळासाहेब वराडे, युवा नेते भूषण पगार,पाळे खुर्द उपसरपंच कडू पाटील, कळवण सोसायटी माजी चेअरमन शंकरराव निकम, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सागर खैरणार, मुन्ना वाघ, व्यापारी मुन्ना गुंजाळ,बालू वाघ सुत्रसंचलन व आभार सचिव रवींद्र हिरे यांनी केले.