वाखारी येथील रहिवासी, येवला येथील बँकेत नोकरीस असलेल्या शैलेंद्र गोसावी आणि त्यांचे मोठे बंधू दीपक गोसावी या दोन्ही भावांचे कोरोनामुळे निधन झाले. कुटुंबातील कर्ते असलेले शैलेंद्र गोसावी व दीपक गोसावी अचानक सोडून गेल्याने त्यांचा कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यात गोसावी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असून शैलेंद्र गोसावी यांना १ मुलगा,१ मुलगी असून शिक्षण घेत आहे.
अशा बिकट परिस्थितीत आपल्या मृत वर्गमित्राच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत व्हावी या हेतूने देवळा येथील श्री शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बारावी सायन्स सन १९९१ बॅचच्या वर्गमित्रांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करावी, अशी पोस्ट आमनी देवळानी शाळा या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल होताच क्षणार्धात त्याला कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातील वर्गमित्रांनी प्रतिसाद दिला.
या सर्व प्रक्रियेत वर्गमित्र डॉ प्रमोद आहेर प्रकाश भामरे, सरपंच बापू देवरे, डॉ संजय निकम,डॉ नंदकुमार आहेर, अबीद पठाण,संदीप बुरड, पोपट विश्वास, डॉ सुभाष आहेर,प्रशांत निकम, संजय आहेर,दिलीप बागुल, जगदीश गुंजाळ,राजेंद्र मेधने,कैलास भदाणे,दादा कदम, हरी ठाकरे,राजेंद्र जगताप,हेमराज सोनवणे,दीपक अलई, पोपट पगार,किरण आहेर, अभय सोनारे,भिला आहेर, यशवंत सूर्यवंशी,शेखर वाघ, निवृत्ती भदाणे,भारत देवरे, अनिल राणे,वैभव निकम, शरद मेतकर
आदीनी पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला.त्यांना १९९१ च्या बारावी सायन्स बॅचचे वर्गमित्र यथाशक्ती मदत करीत असून चांगला प्रतिसाद देत आहेत. शैलेंद्र गोसावी यांच्या सोबत देवळा कॉलेजला बारावीपर्यंत बरोबर असलेला वर्गमित्र प्रकाश भामरे यांने शैलेंद्र गोसावी कोरोना बाधित असून डॉ प्रमोद आहेर यांच्या त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्याला औषध उपचारासाठी मदतीची गरज असल्यामुळे वर्गमित्रांचा व्हॉट्स अप ग्रुप तयार करुन मदतीचे आवाहन केले होते.
विशेष म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये शैलेंद्र यांचे उपचार सुरु होते ते हॉस्पिटल वर्गमित्र डॉ प्रमोद आहेर यांचे असल्यामुळे त्याला व कुटूंबियांना चांगलीच मदत झाली. आर्थिक मदतीपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे आत्तापर्यंत जमा झालेली एक लाख अकरा हजारच्या आसपास रक्कम त्याच्या कुटुंबियांला आर्थिक मदत व्हावी म्हणून वर्गमित्रांनी शैलेंद्र गोसावी कुटुंबियांची भेट घेऊन पत्नी राजश्री गोसावी यांच्याकडे १ लाख ११ हजाराचा धनादेश सुपूर्द केला.
वर्गमित्रांचा अजूनही आर्थिक मदतीचा ओघ सुरूच असून खर्डे येथील राजेंद्र देवरे या वर्गमित्राचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. देवरे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी सर्व वर्गमित्र पुन्हा सरसावले असून मित्रांना मदतीचे आवाहन केले आहे.या सर्व वर्गमित्रांनी राजधीर फाऊंडेशनची स्थापना केली असून या फाउंडेशनच्या माध्यमातून वर्गमित्रांच्या या कृतीने सर्वांना एकजुटीची व माणुसकीची शिकवण दिली आहे.