कळवण -कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेकांना मोबाईलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरे जावे लागते. शैक्षणिक व आरोग्य हिताच्या दृष्टीने मोबाईल नेटवर्क आता आदिवासी भागात जीवनावश्यक झाल्यामुळे कळवण तालुक्यात ३२ व सुरगाणा तालुक्यात ३३ ठिकाणी मोबाईलचे टॉवर नेटवर्क सक्षमपणे जोडण्याच्या कामास सुरुवात झाली असल्याची माहीती आमदार नितीन पवार यांनी दिली.
जानेवारी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या दालनात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थित मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर तात्काळ पाऊले उचलण्यात आली .कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे करिता नेटवर्कची आवश्यकता असल्याने मोबाईल नेटवर्क आदिवासी भागातील जीवनावश्यक बाब असल्याचे ओळखून आमदार नितीन पवार यांनी जिओ कंपनीचे जिल्हा समन्वयक विकास ताजने व ललित महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन सुरगाणा तालुक्यात भूमिगत दूरसंदेश वाहक तारद्वारे प्रत्येक टॉवर नेटवर्कच्या जाळ्याने जोडण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे
सुरगाणा तालुक्यातील राक्षस भुवन, भवाडा, भेंडवळ, फणसपाडा, आमदा पळसन, बाफळून, तोरण डोंगरी, अलंगुण, उंबरठाण, करंजुल, हाडकाईचोंड, आंबाठा, कोठुळा, भोरमाळ, खोबळा, धुरापाडा, काशी शेम्बा, शिंगलचोंड, सराड, हतगड, बोरगांव, ते गुजरात हद्द पर्यंतची गांवे भूमिगत दूरसंदेश वाहक तारा व्दारे जोडण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे.
मोखपाडा, सांभरखल, ठाणगांव, आंबोडे, आळिवपाडा, रानपाडा, खिराड, खिर्डी, खोकरविहीर, देशमुखनगर, गोंददगड, गोपालनगर, वाघधोंड, भेगू, सावरपाडा, वांगण, बर्डा, सालभोये, दांडीचीबारी, हरणटेकाडे, जामुनमाथा या गावातील टॉवर देखील नेटवर्कने जोडली जाणार आहे.
कळवण तालुक्यातील जयदर, दळवट, चिंचपाडा, गणोरे, शिरसमणी, शिरसा, देवळीकराड, बोरदैवत, सरलेदिगर, मुळाणे, करंभेळ, गोपाळखडी, आठंबे, दरेभणगी, बिजोरे, मानुर, हिंगळवाडी, गोबापुर, पिळकोस येथे टॉवर देखील सक्षम नेटवर्कने जोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
आदिवासीचे जीवनमान उंचविण्यासाठी व आदिवासी बहुल ग्रामिण भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरासारखीच अति दुर्गम डोंगराळ भागात देखील मोबाईल नेटवर्कची आवश्यकता ओळखून आदिवासी तालुका देखील 5G टेक्नोलॉजीचा आधार घेत टेक्नोसॅवि व्हावा यासाठी संपूर्ण तालुक्यात इंटरनेटच्या सुविधेसह मोबाईल नेटवर्कचे जाळे विणले जाणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.