कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवण एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अँड शशिकांत पवार, सरचिटणीस बेबीलाल संचेती, विश्वस्त बाबुलाल पगार, नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने सर्व १२ जागांवर विजय मिळवत पुनःश्च संस्थेची सत्ता अबाधित ठेवत एकतर्फी विजय मिळविला.
निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या बैठकीत कळवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ रावसाहेब अमृता शिंदे, उपाध्यक्षपदी हर्षवर्धन प्रभाकर पवार, सरचिटणीसपदी भूषण कौतिक पगार यांची एकमताने निवड करण्यात आली.
कळवण एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होऊन ७८९ पैकी ६७१ आजीव सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २८ मते बाद झाली.त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रियेत आजीव सभासद मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. आर के एम माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी साडेचार वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होऊन त्यात झालेल्या मतमोजणीत कळवण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष अँड शशिकांत पवार, सरचिटणीस बेबीलाल संचेती, जेष्ठ विश्वस्त बाबुलाल पगार, नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने सर्व १२ जागांवर विजय मिळवीत सत्ता अबाधित ठेवली.परिवर्तन पॅनलला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
सर्वाधिक मते भूषण पगार यांना मिळाली –
विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांना सर्वाधिक 541 मते मिळाली.या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि मते पुढीलप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण कौतिक पगार ( 541) भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुधाकर त्र्यंबक पगार (514) कमकोचे माजी चेअरमन प्रविण शांतीलाल संचेती ( 505),संस्थेचे विद्यमान विश्वस्त, कांदा व्यापारी हेमंत ओंकार बोरसे ( 500) संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष, माजी प्राचार्य डॉ रावसाहेब अमृता शिंदे ( 497) कमकोचे माजी चेअरमन गजानन काशिनाथ सोनजे ( 480) कळवण बार असोसिएशनचे सदस्य अँड दीप नामदेव सोनवणे ( 471) संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अँड शशिकांत पवार यांचे पुतणे हर्षवर्धन प्रभाकर पवार ( 460) कळवण एज्युकेशन संस्थेचे माजी अध्यक्ष स्व कारभारी जयराम पगार यांचे सुपुत्र अरुण कारभारी पगार ( 460) संस्थेचे विद्यमान विश्वस्त रघुवीर केदू महाजन ( 460) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, संस्थेचे विश्वस्त राजेंद्र काशिनाथ भामरे ( 441) संस्थेच्या माजी विश्वस्त श्रीमती सुमनताई वसंतराव देवरे ( 434) हे विजयी झाले.
परिवर्तन पॅनलचे डॉ पोपट पर्वत पगार ( 282) किरण हरि पगार ( 245) डॉ पंकज बाळासाहेब पगार ( 195) हर्षल सुहास पगार ( 174) दिलीप तुकाराम पगार (159) संजय तुळशीराम निकम ( 128) व अपक्ष खंडेराव नानाभाऊ निकम (43) यांना पराभव पत्कारावा लागला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड भगवान मुरलीधर पगार तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड अमित विजय जुन्नरे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा राजेंद्र कापडे, प्रा शिवलाल पगार, प्रा विनायक पगार, प्रा सुनील पाटोळे तर मदतनीस म्हणून बापूराव जाधव यांनी काम पाहिले.
यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार,प्रताप पवार, योगेश पगार, डॉ पराग पगार,अतुल पगार,विजय पगार, गोरख पगार, रोहित पगार, राजेंद्र सोनजे, रंजन देवरे,यतीन सोनजे,सतीश पगार, विष्णू बोरसे,राहुल पगार, अभिमन पगार,केदा जाधव, सुनील गांगुर्डे, नितीन पगार, सुधाकर खैरनार, प्रणव संचेती, निंबा नेरकर, रावसाहेब भामरे, गजेंद्र पवार, मुन्ना बोरसे, संदीप पाटील आदींसह शेकडो समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.
वार्षिक सभा संपन्न –
कळवण एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त कार्यकारी मंडळासाठी मतदान प्रक्रिया सुरु असतांना दुसऱ्या बाजूला वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.अनेक दिवसानंतर होणारी निवडणूक व वार्षिक सर्वसाधारण सभा गाजणार अशी चिन्हे असतांना निवडणूक व सभा शांततेत पार पडल्याने हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आदर्शवत ठरले.
कळवण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ रावसाहेब शिंदे –
कळवण एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर नवनिर्वाचित विश्वस्त कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न होऊन त्यात सोसायटी अध्यक्षपदी डॉ . रावसाहेब शिंदे , उपाध्यक्षपदी हर्षवर्धन पवार सरचिटणीसपदी भूषण पगार व खजिनदारपदी कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .बी एस पगार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध संस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले . कळवण शहरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती .