नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील चणकापूर धरणातून नदी व कालव्यावरील पाणी पुरवठा योजनांसाठी पाण्याचे आवर्तन 14 ते 24 जून 2022 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांमधील ज्या गावांतून आवर्तनातील पाण्याचा प्रवाह जाणार आहे, त्या गावांचा वीजपुरवठा सकाळी 8.00 ते रात्री 8.00 यावेळेत खंडीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या आवर्तन कालावधीत चणकापुर धरणातून नदी व कालव्यावरील पाणी पुरवठा योजनांसाठी बिगर सिंचनाकरिता 840 दशलक्ष घन फुट पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनातील पाणी नियमानुसार सोडण्यात येवून हे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या गावांचा राहणार वीज पुरवठा बंद : (तालुका आणि गावांचे नाव असे)
कळवण – मौजे कळवण, गोसराणे, अभेणा, पाळे खुर्द, भादवन, पिंपळकोस, जुनी बेज, निवाणे, कनाशी, खडकवण, कळमाथे व पाळे बुद्रुक इत्यादी
देवळा – मौजे खमखेडा, लोहणेर, देवळा नगर पंचायत व देवळा प्रादेशिक पाणी पुरवठा उद्भव, गिरणा नदीकाठ व विठेवाडी
सटाणा – मौजे ठेंगोडा, आरई, शेमळी, ब्राम्हणगाव, यशवंतनगर, लखमापूर, धांद्री
मालेगाव – मौजे पांढरूण, तळवाडे, धवळेश्वर, रावळगाव इत्यादी