अध्यक्ष सुनिल महाजन, उपाध्यक्ष नितीन वालखडे यांनी दिली माहिती
कळवण – दी कळवण मर्चंट्स को-ऑफ बँकेस सन 2020-21 या आर्थिक वर्षात सुमारे 6 कोटी 88 लाख 76 हजार रुपयांचा विक्रमी ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी वजा जाता 1 कोटी 73 लाख 76 हजाराचा विक्रमी नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनिल महाजन उपाध्यक्ष नितीन वालखडे यांनी दिली.
यावेळी महाजन यांनी सांगितले की, गेले वर्षभर कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच मध्यंतरी अवकाळी पावसानेही बरेच नुकसान केले. अशाही अशाही परिस्थितीत बँकेने कर्जावरील व्याजदर वेळोवेळी कमी केले ,बँकेच्या संचालक मंडळासह सर्व कर्मचारी, कर्ज वसुली प्रतिनिधी यांनी अत्यंत कठोर मेहनत घेत थकबाकी वसुली व एनपीए वाढणार नाही याची दक्षता घेतली. त्यामुळेच कोरोना काळात बँकेस 6 कोटी 88 लाख 76 हजाराचा ढोबळ नफा झाला आहे.
बँकेचे वसूल भागभांडवल 4 कोटी 69 लाख 3 हजार रुपये असून गंगाजळी 30 कोटी 40 लाख 24 हजार रुपये तर सरकारी रोखे 90 कोटी 52 लाख 7 हजार रुपये आहे, विविध वित्तीय संस्थामध्ये एकूण ठेवी 190 कोटी 27 लाख 62 हजार रुपये असून यामध्ये मागील वर्षा पेक्षा 13 कोटी 20 लाखने ठेवी मध्ये वाढ झाली आहे बँकेने सभासद व्यापारी, व्यावसायिक, बेरोजगार, युवक, महिला आणि उद्योजक यांना 101 कोटी 57 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
बँकेचे खेळते भांडवल 239 कोटी 71 लाख 48 हजार रुपये असून वित्तीय संस्थामध्ये 112 कोटी 10 लाख 49हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेची थकबाकी मागील वर्षी पेक्षा 4.03 टक्के ने कमी झाली असून रिजर्व बँकेच्या निर्देशांकनुसार बँकेचा नेट एनपीए हा 5.92 % ठेवण्यात यश आले आहे. येत्या काळात सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुनील महाजन,उपाध्यक्ष नितीन वालखडे यांनी सांगितले.
यावेळी जनसंपर्क संचालक राजेंद्र अमृतकार, गजानन सोनजे, प्रविण संचेती, निंबा कोठावदे, योगेश मालपुरे, डॉ धर्मराज मुर्तडक, प्रभाकर विसावे, पोपट बहिरम, शालिनी महाजन, भारती कोठावदे, प्रभाकर कोठावदे, गालिब मिरझा, अविनाश कोठावदे, मिलिंद मालपुरे,सर्व समितीचे सदस्य तक्रार निवारण समिती अध्यक्ष मोतीराम पगार मुख्य व्यवस्थापक कैलास जाधव, उपव्यवस्थापक महेंद्र भावसार, उपव्यवस्थापक मनोज कोठावदे, अभोणा शाखा अधिकारी प्रसन्न गायधनी, वसुली अधिकारी प्रविण घुगे, कर्ज अधिकारी प्रविण खैरनार हे उपस्थितीत होते.
….