कळवण- राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून कळवण पोलिसांनी रस्त्यावर जागता पाहरा देत रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रथम समज नंतर प्रबोधन अन तिसऱ्यांदा दांडूक्याचा प्रसाद देत पिटाळून लावल्यामुळे संचारबंदी काय असते हे अनेकांनी अनुभवले.
दरम्यान आज त्याचे पडसाद उमटून कळवण शहरात गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करत विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी केल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसले.तर जनता कर्फ्यु सुरू असल्याने तुरळक गर्दी वगळता शांतता दिसून आली.कळवण शहरात सोमवार पासून ते रविवार पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कायम असल्याचे चित्र बुधवार पर्यंत होते.
मात्र राज्यात गेल्या बुधवारपासून संचारबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात येऊन कळवणचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करुन बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली. पोलिस कारवाई मुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आज दिसून आले. कळवण शहरात सोमवार पासून ते रविवार पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कायम असल्याचे चित्र बुधवार पर्यंत होते.मात्र राज्यात काल रात्रीपासून संचारबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याने कळवणचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड,पोलिस उपनिरीक्षक महेश निकम,ठोंबरे यांच्या पोलिसांकडून ठिकठिकाणी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात होती.पोलिस कारवाई मुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आज दिसून आले.