लस घेणारे व कोविडमधून बाहेर पडणाऱ्यांचा झाला हिरमोड
…..
कळवण – येथील श्री धनलक्ष्मी पतसंस्था,श्री विठ्ठल फाऊंडेशन ग्रुप ऑफ कळवणच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्लाझ्मा व रक्तदान शिबिरास कोविड काळातही उत्तम प्रतिसाद मिळाला.लस घेणारे व कोरोना आजारातून बाहेर पडलेले शेकडो नागरिक रक्तदानासाठी आले परंतु रक्तदान न करण्याचा सल्ला वैद्यकीय यंत्रणेने दिल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. कुठलीही आरोग्याची तक्रार नसलेल्या २२ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले असून ६ जणांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढाकार घेत शिबीर यशस्वी केले.लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित कोविड काळातील पहिल्याच प्लाझ्मा व रक्तदान शिबिरात संचारबंदी व लॉकडाऊन काळातही रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे डॉ विवेक काळोगे, टेक्निकल सुपरवायझर मनिष सराफ,गणेश भोये,गजानन पावरा,आनंद हाळदे,सुनील पवार यांनी रक्तदान शिबिराची प्रक्रिया पूर्ण केली.
श्री धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक महाजन,लक्ष्मण खैरनार,चंद्रकांत बुटे, संजय वालखेडे,सौ रेखा सावकार,श्री विठ्ठल फाऊंडेशन ग्रुप ऑफ कळवणचे संजय पगार,सुनिल मालपुरे, लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय अध्यक्ष राजेंद्र मालपुरे,किरण अमृतकार, व्यवस्थापक योगेश कोठावदे, जयेश अमृतकार, योगेश महाजन,अक्षय पगार,प्रविण चव्हाण,विजय दळवी आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,जलतज्ज्ञ डॉ किशोर कुवर यांनी भेट रक्तदात्यांचे स्वागत करुन उपक्रमाचे कौतुक केले.
दातृत्व गुण जोपासून हे शिबिर यशस्वी केले
कोविड-१९ काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून,एक राष्ट्रीय कर्तव्य समजून घेण्यात आलेल्या प्लाज्मा व रक्तदान या अनोख्या व गरजेच्या ठरणाऱ्या शिबिरामध्ये शेकडो जणांना आरोग्याच्या कारणांवरून परत फिरावे लागले हे प्रसंगावधानाने घडले असले तरी ज्यांनी दातृत्व गुण जोपासून हे शिबिर यशस्वी केले त्यांच्या कार्याला निश्चितच मानाचा मुजरा आहे.
-प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक कळवण