नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचे वतीने भारतरत्न लतादीदी यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सायं ६ वाजता स्वर मंगेशाचे या सांगितीक विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन महाकवी कालिदास कला मंदिर येथे मंगेशकर पाचही भावंडांवर आधारित हा कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना गायिका चैत्राली अभ्यंकर यांची आहें. यात त्यांच्या सोबत मुंबईचे गायक अॅड.अमित दाते आणि नाशिक मधील गायक संदीप थाटसिंगार गायन, साथ करणार आहे. वादयवृंद संयोजन रागेश्री धुमाळ यांचे असून अनिल धुमाळ, आदित्य कुलकर्णी, अभिजीत शर्मा, महेश कुलकर्णी, साथ संगत करनार आहे. संहिता लेखन प्रवीण जोशी यांचे असून अभिवाचन अक्षय वाटवे करतील. रसिकांनी उपस्थित राहून दीदींना आदरांजली द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहें. या कार्यक्रमच्या विनामूल्य प्रवेशिका कालीदास सभागृहात उपलब्ध आहेत.