इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वसामान्यांना जसे दिवाळीचे अप्रूप असते, तितकेच किंबहुना त्याहूनही कैक पटीने अधिक सेलिब्रिटींसाठी महत्त्वाचा असतो. यंदा तर बॉलीवूडसाठी दिवाळी जणू एक आठवडा आधीच सुरू झाली. विविध सेलिब्रिटींच्या घरी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्ट्यांना इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांपासून स्टारकिड्सपर्यंत सर्वांनीच हजेरी लावली. या दिवाळी पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. या स्टारकिड्समध्ये प्रमुख चर्चा रंगली ती अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासाचे. सध्या सोशल मीडियावर न्यासाची जोरदार चर्चा होत आहे.
दिवाळीच्या एका पार्टीत न्यासाचा जबरदस्त लूक पहायला मिळाला. तिचा हा व्हिडीओ पापाराझींनी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर सध्या नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. आधीपेक्षा न्यासा आता खूपच वेगळी दिसत असल्याचे अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटले आहे. यावेळी न्यासाने निळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. न्यासाचा हा लूक पाहून तिने चेहऱ्यावर कोणती सर्जरी केली की काय, असाच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी न्यासाच्या नाकाच्या सर्जरीचा संशय व्यक्त केला आहे.
यातील एका व्हिडीओमध्ये न्यासाची एक बाजू ही हुबेहूब अभिनेत्री जान्हवी कपूरसारखी दिसत असल्याची कॉमेंट काहींनी केली आहे. न्यासाचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिले तर त्यात स्पष्ट फरक दिसतो. त्यामुळे अजय आणि काजोलच्या मुलीने नक्कीच काहीतरी केलं असावं, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
अजय आणि काजोलची मुलगी न्यासा ही 19 वर्षांची आहे. न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत अनेकदा अजयला प्रश्न विचारले गेले. मात्र त्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं. “न्यासाला अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे की नाही हे सध्या तरी मला माहित नाही. अजून तरी तिला त्यात रस नाही. पण वेळेनुसार ते बदलूही शकतं”, असं अजयने एका मुलाखतीत सांगितलं होतं. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सप्रमाणे न्यासा सोशल मीडियावर फार कधी चर्चेत नसते. इन्स्टाग्रामवर ती सक्रिय असून तिथे बरेच फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
Kajol Daughter Nyasa Devgan Look Change Social Media