शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कादवा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; यंदा एवढ्या ऊसाचे आहे उद्दीष्ट

नोव्हेंबर 1, 2022 | 6:32 pm
in स्थानिक बातम्या
0
DSC 0512 scaled e1667307686240

 

दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साखर उद्योग अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व त्यांचे संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीने काम करत कादवा सुरू ठेवत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आदर्श निर्माण केला आहे.गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष भाजीपाला चे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत असताना ऊस हे शाश्वत पीक बनले आहे .मतदारसंघात पाण्याचे विविध साठे निर्माण केले असून विजेची उपलब्धता वाढविण्याचे काम सुरू आहे तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे 46 वे गळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,माजी खासदार देविदास पिंगळे,आमदार दिलीप बनकर,माजी आमदार शिरीष कोतवाल,मवीप्र सरचिटणीस नितीन ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,मविप्र संचालक सयाजी गायकवाड,राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ,चेअरमन श्रीराम शेटे,व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते व संचालक मंडळ आदींच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगाम शुभारंभ झाला त्यावेळी झिरवाळ बोलत होते .प्रारंभी गव्हाण पूजा सौ. व श्री. विलास कड,सौ. व श्री.राजाराम भालेराव,सौ. व श्री. भरत देशमुख,सौ. व श्री.रामदास मातेरे,सौ. व श्री.परिक्षीत देशमुख,सौ. व श्री.नारायण पालखेडे यांचे हस्ते झाले.

पुढे बोलताना नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत बहुतांशी रस्त्यांची कामे मंजूर असून सर्व कामे सुरू होतील जी कामे पावसाळ्यात खराब झाले ते पुन्हा करून घेतले जातील तसेच सर्व कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या असून सर्वांनी चांगले काम करून घेण्यासाठी दक्ष राहावे असे आवाहन केले.

यावेळी चेअरमन श्रीराम यांनी प्रास्ताविक करताना साखर उद्योग व कारखान्याची वाटचाल विषद केले.अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा ने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे यंदा ऊस तोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून सुमारे पाच लाख मेटन ऊस गाळपा चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तरी हंगाम यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. ऊस तोडीचे योग्य नियोजन करत प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊस तोड करण्यात येईल असे सांगितले. केंद्र सरकारने इथेनॉल ला प्रोत्साहन दिले असून कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून त्याचा निश्चित शेतकऱ्यांना लाभ होणार आहे त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्या त्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्या असे आवाहन केले. सीएनजी प्रकल्प विचाराधीन असून संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे ऊस हे शाश्वत पीक असून सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.

यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे,आमदार दिलीप बनकर,माजी आमदार शिरीष कोतवाल,मवीप्र सरचिटणीस नितीन ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके,तुकाराम पेखळे,दिलीप थेटे,बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख,राजाराम बस्ते,दत्तात्रेय राऊत,अशोक वाघ,सुनील पाटील,रंजन पवार,राजू ढगे,उत्तम ठोंबरे,रंगनाथ बर्डे,अशोक कबाडे,विठ्ठलराव संधान, बाकेराव जाधव , शिवाजी जाधव,त्रंबक संधान,दत्तात्रेय जाधव,शंकरराव काठे,विठ्ठल संधान, भाऊसाहेब बोरस्ते,कैलास मवाळ ,गुलाब जाधव,बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, सुरेश बोरस्ते, रामनाथ पाटील, भास्कर भगरे,डॉ.योगेश गोसावी, शाम हिरे, बाजीराव बर्डे, चिंतामण पाटील,बाळासाहेब भालेराव,अशोक भालेराव,रामभाऊ ढगे,सुरेश कळमकर,संजय जाधव,दत्तात्रेय गटकळ ,बाबुराव डोखळे, सुरेश कोंड,प्रकाश देशमुख, पंढरीनाथ संधान,बापूराव पाटील, तानाजी माळी,बबनराव देशमुख,छबू मटाले,भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब सरोदे, गणपतराव सरोदे, पांडुरंग गडकरी,तुकाराम जोंधळे, शिवाजी दळवी,युनियन अध्यक्ष भगवान जाधव, संचालक दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, शहाजी सोमवंशी,दिनकरराव जाधव, विश्वनाथ देशमुख, बापूराव पडोळ ,अमोल भालेराव, सुखदेव जाधव, सुभाषराव शिंदे मधुकर गटकळ,सुनील केदार,राजेंद्र गांगुर्डे, रामदास पिंगळ, नामदेव घडवजे, जयराम उगले , अशोक वडजे, सोमनाथ मुळाने, साहेबराव कक्राळे ,गंगाधर निखाडे, संतोष मातेरे आदींसह सर्व संचालक,अधिकारी सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने, संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

Kadava Sugar Factory Season Start
Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ट्विटरच्या ब्लू टीकसाठी आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे; एलॉन मस्क म्हणाले…

Next Post

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात..

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Eknath Shinde Devendra Fadanvis e1660037599940

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात..

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011