दिंडोरी – कादवा सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगामाची सर्वतोपरी तयारी झाली असून रविवार दि 10 ऑक्टोबर 2021 रोजी बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे.
बॉयलर पूजा सौ.व श्री. बाळासाहेब विठ्ठल देशमुख, लखमापुर व सौ श्री.मधुकर कारभारी टोपे,पिंपळद यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे राहणार आहे. कादवाने यंदा गळीत हंगामाची पूर्ण तयारी करत अधिक क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध मशिनरीची दुरुस्ती देखभाल ही कामे जवळपास पूर्ण झाले आहे. ऊसतोडणी साठी पुरेशी मजूर भरती केली आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळ्यास कोविड -19 चे सर्व निर्देश पाळुन उपस्थित राहण्याचे आवाहन कादवाचे संचालक मंडळाने केले आहे.