दिंडोरी – तालुक्यातील पालखेड बंधारा येथील कादवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 2021 या वर्षाचे कादवा गौरव पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, दिनकरराव गायकवाड, विठ्ठलराव संधान यांनी जाहीर केले आहे. आपल्या कार्य कर्तृत्वाने विधान सभेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झालेले नरहरी झिरवाळ यांना राजकीय क्षेत्रातील तर कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यचा पुरस्कार मोहाडी येथील सुरेश कळमकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. या वर्षाचे विविध क्षेत्रातील कादवा गौरव पुरस्कारार्थी असे
हंसराज देशमुख (उद्योजक )
नितीन गांगुरडे (जलदूत)
नितीन झगरे (सांस्कृतिक)
दीपक बागमार (वैद्यकीय )
आढाव जी.आर. (प्रशासकीय)
विलास जमधडे (शैक्षणिक )
ज्ञानेश्वर गणोरे (कृषी पुरक उद्योग)
भगवान गायकवाड (पत्रकार)
किरण सोनार (सामाजिक)
या मान्यवरांना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवार दि.31 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केल्याचे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी कळविले आहे.