काबूल – अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैनिकांनी माघार घेतली असली तरी अब्जावधी डॉलरच्या अमेरिकेच्या हत्यारांच्या साठ्यावर तालिबानने ताबा मिळविला आहे. तालिबानचे बंडखोर अमेरिकेच्या सर्वात धोकादायक हत्यारांपैकी एक असलेल्या युद्धवाहू हेलिकॉप्टरसोबत फोटो काढत असल्याचे तसेच हमवीजसारख्या वाहनांवर रपेट मारताना दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर आता अमेरिकी असॉल्ट रायफल आहेत. ही सामग्री अमेरिकेच्या सैनिकांनी अफगाणिस्तानच्या लष्कराला पुरविलेली आहे.
तालिबानी अमेरिकेचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उडविण्याचा कथितरित्या प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमेरिकेच्या पेंटागन विभागाच्या लॉजिस्टिक एजन्सी (डीएलए) च्या आकडेवारीच्या आधारावर दावा केला की, अमेरिका अफगाणिस्तानमध्ये ८.८४ लाख हत्यारे आणि सैनिक उपकरणे सोडून गेले आहेत.
तालिबानकडे कोणकोणते हत्यारे
– अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानात ८.८४ लाख हत्यारे आणि सैनिक उपकरण सोडून आले.
– हत्यारांची संख्या जवळपास ६ लाखांच्या आसपास
– तालिबानवर ताबा मिळविण्यापूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकेचे २०८ विमाने आणि हेलिकॉप्टर
– उपग्रहाच्या छायाचित्रात २६ हेलिकॉप्टर आणि विमाने तालिबानी अड्ड्यांवर उभे दिसले.
– पाच हेलिकॉप्टर तालिबानच्या इतर ठिकाणांवर उभे दिसले.
– २३ ए-२९ हलके विमान
– ६० वाहतूक करणारे विमान त्यामध्ये सी १३०, सी-१८२, टी-१८२ आणि एएन-३२ चा समावेश
– ३३ एसी- २०८ विमान
– १८ पीसी- १२ सर्विलांन्स विमान
– ०८ चालक रहित विमान
हेलिकॉप्टर
– ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर – ३३
– १७ हेलिकॉप्टर ३२ एमआय
– ५३० हेलिकॉप्टर ४३ एमडी
दारूगोळा
– आधुनिक रायफल ३,५८,५३०
– घातक एम-४ कार्बाइन ३५९८
– मशीन गन ६४ हजारांहून अधिक
– ग्रॅनेड लाँचर २५ हजारांहून अधिक
– आधुनिक पिस्तुल १२३२९५
– रॉकेट आधारित हत्यार ९८७७
– मोर्टार आणि तोफा – २३०६
युद्धवाहक
– सोडून आलेली युद्धवाहने ७५८९८
– मोबाइल स्ट्राइक फोर्स व्हिकल ३१
– हमवीज युद्धवाहन ३०१२
– क्रेन आणि रिकव्हरी वाहन १००५
– भूसुरुंगांपासून बचाव करणारे एमआरपी वाहने ९२८
– बॉम्बविरोधी वाहने (एपीसी) १८९
तालिबानकडे हवाईदल
जगभरात कोणत्याही दहशतवादी संघटनेकडे स्वतःची हवाईदल नाही. काही दहशतवादी संघटनांकडे ड्रोनचे तंत्रज्ञान आहे. परंतु हवाईदल असलेली तालिबान ही एकमेव संघटना आहे. तालिबानने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरवर ताबा मिळविला असला तरी ते हाताळणे इतके सोपे नाही. त्यांची देखभाल करण्याचे कामही खूप खर्चिक असल्याने तालिबानसमोर मोठे आव्हान आहे.
कुर्ता पायजमाच्या जागी अमेरिकेची वर्दी
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांनुसार, अनेक तालिबानी बंडखोर आपले पोषाख बदलत आहेत. ते कुर्ता पायजमाच्या जागी आता पूर्णपणे वर्दीमध्ये दिसत आहेत. अनेकांची दाढीही दिसत नाही. त्यांच्या हातात गंजलेल्या हत्यारांऐवजी अत्याधुनिक हत्यारे आली आहेत. अफगाणी सैनिकांकडून ही हत्यारे हिसकाऊन घेण्यात आली आहेत.