अफगाणिस्ताण – काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये ९० जण ठार झाले असून २०० जखमी झाले आहे. एक आत्मघातकी हल्ला हा विमानतळाच्या गेटवर तर दुसरा हल्ला बेरान हॉटेलजवळ झाला. या हल्ल्यात १२ अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशवादी संघटनेकडून या स्फोटांची जबाबादारी घेण्यात आली आहे. तालिबाननंही काबूल विमानतळाववर आयएसआयएस या दहशवाद्यांकडून हल्ल्याचा धोका जाहीर करण्यात आला होता. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटच्या घटनांनी काबूल हादरले आहे. अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अमेरिका राष्ट्रपती जो बाइडन यांनी या हल्ल्यानंतर सेना याचे उत्तर देईल असे सांगितले.