मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा कबड्डी असोशिएशन व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयोजनाखाली मनमाड येथे आयोजित ७० प्रौढ गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी आमदार चषक कबड्डी स्पर्धेत ब्रह्मा आडगाव संघाने नाशिकरोडच्या बालाजी स्पॉट्स क्लब संघाचा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. तर महिला गटात नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीने बालाजी स्पोर्टस संघाचा धुव्वा उडवीत अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतून अहमदनगर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे.