नाशिक – के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत दरवर्षी प्रमाणे अखेरच्या वर्षातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्या पूर्वीच नोकरी मिळावी या उद्देशाने कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन केले जाते. Infosys, Mahindra & Mahindra आणि Property Pistol इत्यादी कंपन्यांकडून के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्पुटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, ई अँड टीसी, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हील, मेकॅनिकल, प्राॅडकशन आणि एम.बी.ए च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पदतीने मुलाखती घेतल्या गेल्या.
या सर्व कंपनीच्या मुलाखतीमध्ये प्रथमतः ऑनलाईन टेस्ट त्यानंतर टेक्निकल टेस्ट, वैयक्तिक मुलाखतीची फेरी घेण्यात आली. हे सर्व निकष पार करण्याऱ्या विद्यार्थ्यांची Infosys मध्ये ४३, Mahindra & Mahindra मध्ये २२ आणि Property Pistol मध्ये १५ असे एकूण ८० विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ७.५० लाख आणि सरासरी ३ लाख पर्यंतचे पॅकेज देऊन ऑफर लेटर देण्यात आले.
यामध्ये कॉम्पुटर ८, आय टी ६, ई अँड टीसी ६, इलेक्ट्रॉनिक्स ६, इलेक्ट्रिकल १३, केमिकल २, सिव्हील ४, मेकॅनिकल २८, प्राॅडकशन ४ आणि एम.बी.ए ३ अशा एकूण ८० विद्यार्थ्यां मध्ये २३ मुली आणि ५७ मुलांचा सामावेश आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत विविध कंपनींच्या निवड प्रकिया झाल्या असून अजून ८ महिने ह्या सत्रासाठी निवडप्रक्रिया घेण्यात येणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी. के. शहाबादकर यांनी दिली.
मुलाखतीसाठी ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट, मॉक इंटरव्हूवचे आयोजन करून सराव करुन घेतले. ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविष्वास वाढला आणि ते निवड प्रक्रीयेला समर्थपणे सामोरे गेले. विद्यार्थ्यानं मधील सुप्त गूण विकसीत होऊन एक समाजभिमुख अभियंता निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालय तत्परतेने कार्य करत आहे व भविष्यातही असेच कार्य करत राहिल असा विश्वास प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या काळात कंपनीने विद्यार्थ्यांना दिलेल्या संधी दिल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब वाघ यांनी सर्व कंपन्यांचे आभार मानले. संस्थेचे विश्वस्त मा. श्री. चांगदेवराव होळकर, मा. श्री. अशोक भाई मर्चंट, मा. श्री. समिर वाघ, सचिव मा.प्रा.के. एस बंदी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एन.नांदूरकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.एस.साने, अधिष्ठाता डॉ. बी ई. कुशारे, डॉ. डि. एम. चांदवडकर, डॉ. पि. डी. भामरे, प्रा. एस. वाय. कुटे, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.