नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील नामांकित कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ते २०३१-३२ या दहा वर्षांसाठी ऑटोनामस अर्थात स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नाशिक विभागातील हे केवळ अभियांत्रिकी महाविद्यालये पहिले स्वायत्त महाविद्यालय असणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी दिली.
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नांदुरकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सन १९८४ मध्ये स्थापन झालेल्या के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाने महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या क्षितिजावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय असा नाव लौकिक मिळविला आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात दहावी भाग असून महाविद्यालयात कम्प्यूटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेडिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड डेटा सायन्स, रोबोटिक्स अॅण्ड ऑटोमेशन कम्प्युटर सायन्स डिझाईन या विषयांमधील शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या दहा विभागांपैकी सात विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडीटेशन तर्फे एनबीए नामांकन प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅकची ए श्रेणी प्राप्त झाली आहे. एकाच वेळी इतक्या विभागांना नामांकन मिळवणारे के. के. वाघ अभियांत्रिकी नाशिक हे नाशिक विभागातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे या व्यतिरिक्त के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन पदव्युत्तर कोर्स म्हणजे एम.ई. इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन आणि सिव्हील तसेच एमबीए व एमसीए अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. यापैकी एमसीए सुद्धा एन.बी.ए. मानांकित आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालय चार विभागात पीएचडी रिसर्च सेंटर उपलब्ध असून आतापर्यंत २० विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण करून पीएचडी पदवी संपादन केली आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयाची ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली मार्फत आयडिया या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. हा प्रकल्प एकूण १ कोटी १० लाख रुपयांचा असून यापैकी ५० टक्के अनुदान हे एआयसीटीई मार्फत येणार आहे. या प्रकल्पासाठी भारतातील केवळ ४९ महाविद्यालयास मान्यता देण्यात आली असून महाराष्ट्रातील ५ महाविद्यालयांचा समावेश आहे. खास बाब म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
त्याचप्रमाणे दर्जेदार शिक्षण पद्धती आणि उद्योग शिक्षण संस्थेतील संबंध यांवर आधारित अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय उद्योग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय सतत चार वर्ष सर्वोच्च प्लॅटिनम इन्स्टिट्यूट म्हणून गौरविण्यात आले आहे.
दरवर्षी शंभराहून अधिक नामांकित कंपन्या या अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस सिलेक्शन साठी येत असतात सन २०२०-२१ व्या वर्षात सुमारे ५५० विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली त्या विद्यार्थ्यांना जास्त वार्षिक पॅकेज १५ लाख इतके मिळाले तर सरासरी पॅकेज साडेचार लाख इतके मिळाले होते. महाविद्यालयाची समाजातील प्रतिष्ठा तसेच राबविण्यात येणारे विविध उपक्रम, संशोधन प्रकल्प तसेच अद्ययावत प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडा सुविधा आणि निवास व्यवस्था इत्यादी सुविधा लक्षात घेऊन तसेच पारदर्शक पद्धतीने होणारी शिक्षकांची निवड विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेची संस्थेचे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन आणि शैक्षणिक प्रगती या सर्व बाबी लक्षात घेऊन यूजीसी तर्फे नेमण्यात आलेल्या सहा जणांच्या तज्ज्ञ समितीने के के वाघ महाविद्यालयाला अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याबाबत शिफारस केली त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढील दहा वर्षासाठी स्वायत्त कॉलेजचा दर्जा दिला आहे.
सदर शैक्षणिक २०२२-२३ पासून शैक्षणिक साहित्य राबवण्यात येईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर यांनी दिली, हा स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे त्यास आपला अभ्यासक्रम करण्याची मुभा असेल, स्वतःची परीक्षापद्धती राबवण्यात येईल, उद्योग जगताच्या गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकी अद्यावत करण्यात भर देण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमा दरम्यान उद्योगांमध्ये इंटरंशिप संधी उपलब्ध करून देण्यात येतील, या अभ्यासक्रमामध्ये परदेशी भाषांचे सुद्धा समावेश असल्याने जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात येईल, असेही डॉ. नांदुरकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, अशोक मर्चंट, चांगदेवराव होळकर, सचिव प्रा. ए.एस. बंदी, प्रा. सुनील कुटे, अजिंक्य वाघ, डॉ. साने, प्रा. अहिरे आदि उपस्थित होते.