शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्राचे उदय लळित होणार सरन्यायाधीश; या तारखेला घेणार पदभार

by Gautam Sancheti
ऑगस्ट 4, 2022 | 1:57 pm
in राष्ट्रीय
0
FZS5XSNagAALvgf e1659601556745

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायमूर्ती उदय उमेश लळित हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. लळित हे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रवासियांसाठी ही एक अभिमानाी बाब असणार आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे.

न्यायमूर्ती लळित हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. एन व्ही रमणा या महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत, त्यानंतर लळित हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. ज्येष्ठतेच्या आदेशानुसार न्यायमूर्ती लळित हे सरन्यायाधीश होण्याचे दावेदार होते. न्यायमूर्ती लळित हे तिहेरी तलाकसारखे महत्त्वाचे निर्णय देणार्‍या खंडपीठाचा एक भाग आहेत ज्याचा देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

न्यायमूर्ती लळित हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असतील, जे बार कौन्सिलमधून न्यायाधीश बनले आणि नंतर त्यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली. यापूर्वी हे मार्च १९६४ मध्ये घडले होते. तेव्हा न्यायमूर्ती एस एम सिक्री यांना बार कौन्सिलमधून न्यायाधीश होण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते १९७१ मध्ये सरन्यायाधीश देखील झाले.

न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती लळित दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती लळित हे देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक आहेत आणि त्यांची १३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा भाग आहेत.

https://twitter.com/pradeepraiindia/status/1555087642919784448?s=20&t=YH54ad46eMyRvuW0u_MDfw

केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराच्या देखभालीशी संबंधित प्रकरणातही त्यांनी हा निकाल दिला होता. इतकेच नाही तर POCSO कायद्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या खंडपीठाचेही न्यायमूर्ती लळितहे सदस्य होते. या निकालात असे म्हटले आहे की, जर कोणी चुकीच्या हेतूने मुलाच्या खाजगी भागाला स्पर्श केला तर तो देखील POCSO कायद्याच्या कलम ७ अंतर्गत लैंगिक छळ म्हणून गणला जाईल. या निर्णयान्वये सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला होता, ज्यामध्ये त्वचेशी संपर्क नसल्यास तो लैंगिक छळ मानला जाणार नाही, असे म्हटले होते.

९ नोव्हेंबर १९५७ रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती लळित यांनी जून १९८३ मध्ये वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे वकील होते. त्यानंतर १९८६ मध्ये ते दिल्लीत आले आणि एप्रिल २००४ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. त्यांना टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. न्यायमूर्ती लळित यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यकाळ फारच कमी असेल आणि ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.

Justice U U Lalit will be New Court Justice of India CJI Supreme Court

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पैठणीच्या शेल्यावर साकारली माजी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा (व्हिडीओ)

Next Post

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; आता या तारखेपर्यंत कोठडी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
Next Post
sanjay raut5 e1659349042580

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; आता या तारखेपर्यंत कोठडी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011