पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्या प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. जुन्नरमधील शेतकरी दशरथ केदारी यांनी कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गातील अस्वस्थता, निराशा आणि आर्थिक स्थिती स्पष्ट होत आहे. जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा येथे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना राज्य सरकारने योग्य ती मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
यावेळी पवार म्हणाले की, शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. त्याचा सन्मान राखला पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्वरित लक्ष देऊन प्राधान्यक्रमाने ते सोडवणे अपेक्षित आहे. अशी वेळ इतर शेतकऱ्यांना येऊ नये याची काळजी घ्यावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कांद्याचे भाव दिवसेंदिवस कोसळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यातच यंदा अतिवृष्टीने साठवलेला कांदाही खराब होत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.
Junnar Onion Farmer Suicide market rates