जुनागड (गुजरात) – येथील दोन पोलिस कर्माचा-यांनी एका लष्करी जवानाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात आली असून, दोन संशियत पोलिस कर्माच-यांना निलंबित करण्यात आले आहे. राजेश बांधिया आणि चेतन मकवाना असे संशयितांची नावे आहेत. जुनागड पोलिस अधीक्षक रवी तेजा वसमसेट्टी यांच्या आदेशानुसार हे प्रकरण बांटवा पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
व्हिडिओममध्ये नेमके काय
हा व्हिडिओ २९ ऑगस्टच्या रात्रीचा आहे. मनावदार तालुक्यातील पदर्दी गावात हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. दोन पोलिस कर्मचारी एका जवानाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कान्हाभाई केशवाला असे जवानाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीत आपल्या गावी आले होते. संशयित पोलिस कर्मचारी जवानाला लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
मारहाणीचे कारण काय
या घटनेमागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. जवानाला विनाकारण मारहाण केल्याचे त्यांच्या आईचे म्हणणे आहे. ग्रामस्थ वेगळेच कारण सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रेमविवाहाच्या एका प्रकरणाच्या तपासासाठी काही पोलिस कर्मचारी आले होते. त्यादरम्यान काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. लष्करी जवान या हल्ल्यात सहभागी होता असा संशय पोलिसांना आला होता.