नाशिक – पुणे येथे दिनांक २१ ते २४ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पदकांची कमाई केली. स्पर्धेत नाशिकच्या जयेश शेटे ७३ किलो वजनी गटात अंतिम लढतीत विजय प्राप्त करून सुवर्णपदकाची कमाई केली. तर मुलींच्या ४८ कि लो वजनी गटात नाशिकच्या करूणा थट्टेकरने सहज सुंदर खेळ करून अंतिम लढततीत विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नांवे केले. तर ७८ किलो वजन गटात नाशिकच्या दिव्या कर्डेलनेही सुरवातीपासून आक्रमक खेळ करून अंतिम लढतीतही सुंदर खेळ करून सुवर्णपदक पटकावले. याचप्रमाणे नाशिकच्या ईशान सोनावणे, तनुजा वाघ आणि वैष्णवी यांनी आपल्या गटात ब्राँझ पदकाच्या लढतीत विजय मिळवून नाशिकला ब्राँझ पदक मिळवून दिले. या स्पर्धेत नाशिकचे वीरेंद्र, सार्थक कांबळे, सुयश वैद्य, गायत्री राऊत आणि गौरी क्षीरसागर यांनीही सहभाग घेऊन चांगला खेळ केला परंतु त्यांना पदकाची गवसणी घालता आली नाही.
नाशिकच्या या ज्युदो खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचे नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, मित्र विहार क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर, राज्य ज्युदो असोसिएशनचे रवींद्र मेतकर, ज्यूदोचे प्रशिक्षक विजय पाटील आदिंनी या खेळाडूंचे अभिनंदन केले
या सांघाच्या व्यवस्थापक म्हणून दुर्गा जाधव यांनी भूमिका पार पंडली तर स्वप्नील शिंदे, योगेश शिंदे, माधव भट यांनी पंच म्हणून काम बघितले .
नाशिकच्या खेळाडूंची कामगिरी
सुवर्णपदक – १) जयेश शेटे (७३ किलो)
२) करुणा थट्टेकर ( ४८ किलो )
३) दिव्या कर्डेल
कांस्य पदक – १) ईशान सोनवणे ( ६६ किलो)
२) तनुजा वाघ ( ७० किलो)
३) वैष्णवी खलाने ( ५७ किलो)