इंडिया दर्पण – हास्य षटकार – पेपरचं टेन्शन
(भुऱ्या पेपर देत असतो तेव्हा)
भुऱ्या परीक्षा केंद्रात प्रवेश करतो. त्यानंतर तो बेंचवर बसतो. काही वेळाने त्याच्या हातात प्रश्नपत्रिका पडते. ते पाहून त्याला फुल्ल टेन्शन येतं. त्याला घाम येऊ लागतो.
सुपरवायझर असलेल्या शिक्षिका – अरे, तू पेपर का लिहीत नाहीस? का? काय झालं? काही हवं आहे का? पेन वैगेरे
भुऱ्या – असं काही नाहीय…
शिक्षिका – मग, तब्ब्येत बरी नाही का तुझी?
भुऱ्या – अहो मॅडम जरा गप्प बसा ना. कशाला त्रास देताय.
इतिहासाच्या पेपरची प्रश्नपत्रिका हातात आलीय
आणि मी कॉप्या मात्र भुगोलाच्या आणल्यात.
सगळा लोच्या झालाय.
– हसमुख