मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्या मराठा आरक्षणाबाबत कायम आग्रही भूमिका घेणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहे. त्या प्रशासकीय अधिकारी होत्या. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची जबाबदारी ज्योती मेटे सांभाळत होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आली होती. लोकसभेपासून त्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होत्या. आता देखील त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरु केली होती. मात्र त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे आता त्या बीडमधून उमेदवारी करण्याची शक्यता आहे.
आज शरद पवार व प्रदेशाध्यक्ष व जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मुंबईत हा प्रवेश घेतला. त्यांच्याबरोबर सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, व आमदार शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.