गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुलगा बनून तिने घेतले शिक्षण; आता तालिबानचा क्रूर चेहरा आणतेय जगासमोर

डिसेंबर 6, 2021 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
o9A8A0gw 400x400

नवी दिल्ली – तालिबानच्या छायेत जगणाऱ्या अफगाणी महिलांच्या काही गोष्टी काही साहसी महिला पत्रकारांच्या माध्यमातून समोर येत आहेत. अमेरिका आणि नाटोचे सैनिक माघारी परतल्यानंतर काबूलमध्ये परदेशी पत्रकारांची उपस्थिती घटली आहे. परंतु काही स्थानिक महिला पत्रकार देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आवाज उठवत आहेत. या महिला पत्रकारांचे नेतृत्व इंग्लंडमधून आलेली झहरा झोया ही पत्रकार करत आहे. तिला तिच्या साहसी कामासाठी एका प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय मीडिया मंचावर प्रमुख वक्ता म्हणून बोलावण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

लपून-छपून वार्तांकन
पत्रकार झहरा झोया हिने अफगाणिस्तानमधील महिला पत्रकारांसोबत मिळून गेल्या डिसेंबरपासून रुख्साना मीडिया नावाची एक वृत्तसंस्था सुरू केली होती. अफगाणी महिलांच्या आयुष्यातील आव्हाने पत्रकारितेच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा त्यांचा उद्देश होता. तालिबानी शासन लागू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या निर्बंधात झोया आणि तिच्या टीमने हे काम सुरूच ठेवले आहे. झोया आता इंग्लंडच्या एका हॉटेलमध्ये राहून ही जबाबदारी सांभाळत आहे. काबूलवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर ब्रिटिश सरकारने तिच्या सहकुटुंब देशातून बाहेर पडण्यास मदत केली होती. तिच्या सहकारी पत्रकार अजूनही अफगाणिस्तानातच असून, सतर्कता बाळगून त्या झोयाला बातम्या पाठवतात. त्याशिवाय ती सोशल मीडिया आणि इतर संपर्काच्या माध्यमातून इंग्रजी बातम्या प्रकाशित करते.

पत्रकारितेसाठी मिळाले आर्थिक पाठबळ
ब्रिटनमध्ये येऊन काम सुरूच ठेवण्यासाठी २९ वर्षीय युवा पत्रकार झहरा झोया हिला आर्थिक मदतीची गरज होती. अफगाणी महिलांसाठी वार्तांकन करण्याच्या तिच्या उद्देशाचे नागरिकांनी कौतुक केले. त्यासाठी तिला आतापर्यंत क्राउड फंडिंगमधून ३ लाख डॉलर मिळाले आहेत. झहरा झोया सांगते, की तालिबान सरकारने महिलांचा पोशाख, शिक्षण इत्यादी गोष्टींवर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे तिचे काम आणखी महत्त्वाचे झाले आहे. तिच्या या साहसी कामाबद्दल प्रतिष्ठित थॉमसन रॉयटर्स फाउंडेशनने आपल्या वार्षिक संमेलनात तिला वक्ता म्हणून निमंत्रित केले आहे.

मुलगा बनून शिक्षण पूर्ण
झहरा झोया हिचा अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक हजारा समाजाच्या एका कुटुंबात जन्म झाला आहे. या समाजावर तालिबानी सैनिकांनी अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. १९९२ मध्ये जन्म झालेली झोया जेव्हा मोठी होत होती, तेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासन होते. मुलींना शाळेत जाण्यास परवानगी नव्हती. ती शाळेत मुलगा बनून जात होती हे तिने अनेक मंचावर सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – नागेश्वरची ८५ फूटी शिवमूर्ती!

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, सोमवारचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा दिवस; वाचा, सोमवारचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011