नाशिक – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जात पंचायतच्या अनेक दाहक घटना समोर आल्या आहेत.त्या सत्यकथेवर आता जोखड हा मराठी चित्रपट येत आहे.वेगवेगळ्या सहा भाषेमध्ये हा चित्रपट बनणार असून जात पंचायत हा विषय अधिक व्यापकपणे इतर राज्यात जाणार आहे.
जोखड या चित्रपटाचा औपचरिक मुहूर्त नुकताच नाशिक येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. एक वेगळं वास्तववादी कथानक या चित्रपटातुन समोर येणार आहे. एका वेगळ्या सामाजिक व्यवस्थावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे .आपण २१ व्या शतकात वावरत असताना काही समाजातील मंडळीनी आंतरिक अपंगत्व स्वीकारत बेगडी स्वरूपाच्या बेड्या घालून ठेवल्या आहेंत .याच व्यवस्थेला मुळासकट संपवण्याचा ध्यास घेऊन या लढ्यात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या अट्टहासातून या चित्रपटाची निर्मिती होत आहे.
ए.जी.प्राॕडक्शन चित्रपटाची निर्मिती करत असून, डॉ अशोक गावीत्रे या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहे. सामाजिक, राजकीय, वैद्यकीय ,सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवणारे डॉ अशोक गावीत्रे या चित्रपटाच्या माध्यमातून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत त्यात विजय पाटकर ,सुनील गोडबोले, अनिल नगरकर, सुरेश विश्वकर्मा ,सैराट फेम तानाजी, संजय खापरे, उषा नाडकर्णी ,रोहित सरवार,बाल कलाकार समृद्धी सरवार ,चेतन भांडारकर,शिवाजी जाधव ,महेश खैरनार, वैष्णवी जाधव, दिव्या जगताप, किरण जाधव, दीपिका तोडकर, प्रसाद भागवत, सचिन बनसोडे ,प्रकाश भागवत, यांची भूमिका असणार आहे. चित्रपटाची पटकथा व संवाद लिहीण्याची जबाबदारी लेखक सचिन रा. जाधव पार पाडत असून ,संकलन कुणाल मेढे करत आहे ,चित्रपटामध्ये आदर्श शिंदे ,अवधूत गुप्ते, वैशाली म्हाडे यांच्या आवाजातील गाणे असणार आहे .ए. जी.प्राॕडक्शन निर्मित चित्रपट जोखड लवकरच आपल्या भेटीसाठी तयार होणार आहे. चित्रपटाचे कामकाज अगदी वेगाने सुरु झालेले आहे.. तसेच दिग्दर्शक व अभिनेते शिवा बागुल सर ,अविनाश पाटील अजित देवळे सर , अमेय देवकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.