इंडिया दर्पण – हास्य षटकार – झंप्याचा मालकाला मेसेज
झंप्या एका कंपनीत कामाला असतो.
त्याचे मालक त्याला सांगतात की,
एका व्यापाऱ्याला भेटायला जा.
तेथे व्यापाऱ्याची भेट झाली की मला मेसेज करुन कळव.
झंप्या तत्काळ होकार देतो आणि जायला निघतो.
झंप्या व्यापाऱ्याच्या दुकानात पोहचतो.
त्यावेळी भली मोठी ढेरी असलेला तो व्यापारी
मस्तपैकी खुर्चीमध्ये झोपलेला होता.
त्याच्या घोरण्याचा आवाज संपूर्ण दुकानात घुमत होता.
तो नजारा पाहून झंप्याला आठवण झाली की,
आपल्या मालकाला मेसेज करायचा आहे.
त्याने तत्काळ मोबाईल बाहेर काढला आणि मेसेज टाईप केला,
मालक ते गाढव शांत झोपले होते.
म्हणून भेट झाली नाही.
(खरं तर झंप्याला असे टाईप करायचे होते की,
मालक ते गाढ व शांत झोपले होते.
शब्दात योग्य अंतर न दिल्याने वेगळाच मेसेज मालकांना गेला)
– हसमुख