इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुणी जेव्हा चप्पल दुकानात जाते
(एक तरुणी एका चप्पल दुकानात जाते तेव्हा)
स्पृहा चप्पल घेण्यासाठी दुकानात जाते.
विविध रंग आणि प्रकारातील चप्पल ती बघते.
थोडेथोडके नव्हे तर तब्बल २ तास
ती विविध चप्पल ट्राय करुन बघते.
पण तिला काही पसंद पडत नाही.
तेवढ्यात तिला एक चप्पल आवडते.
स्पृहा विचारते, ‘या चपलीची किंमत किती?’
दुकानदार म्हणतो, ‘अशीच घेऊन जा ‘
ती विचारते, ‘पण का?’
दुकानदार म्हणतो, ‘ही तुमचीच आहे’
– हसमुख