इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा तरुणी डॉक्टरकडे जाते
(वेदना होत असल्याने एक तरुणी डॉक्टरकडे जाते)
डॉक्टर – तुम्हाला कुठे वेदना होत आहेत?
तरुणी – सगळीकडे वेदना आहेत. कृपया मला मदत करा
डॉक्टर – सर्वत्र वेदना होतेय. तुम्हाला काय म्हणायचे आहे? कृपया मला स्पष्ट सांगा.
तरुणीने गुडघ्याला तिच्या तर्जनीने स्पर्श केला आणि ओरडली – इथे वेदना आहे.
मग तिने गालाला तर्जनीने स्पर्श केला आणि म्हणाली – इथे पण वेदना होतात.
मग तिने कानाला हात लावला आणि किंंचाळली – इथेही दुखते. कृपया माझ्यावर उपचार करा
डॉक्टरांनी तिला काही वेळ काळजीपूर्वक तपासले,
मग म्हणाले – तुझे बोट तुटले आहे !!!
– हसमुख