इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुणी आणि स्कुटी
मोहन त्याच्या बाईकवरून ऑफिसला जात होता.
त्याच्या समोरून एक तरुणीही तिच्या स्कूटीवरून चालली होती…
अचानक त्या तरुणीने उजवे वळण घेतले,
मोहनची बाईक तिच्या स्कूटीला जोरदार धडकली…
मोहन : मॅडम, तुम्ही हात किंवा इंडिकेटर तरी दाखवायला हवे होते…
तरुणी – भाऊ, मी येथून रोज उजवे वळण घेते,
तुम्ही कदाचित नवीन आहात…
– हसमुख