इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
महिलेची चेन स्नॅचिंग
एक महिला रस्त्याने जात होती.
त्याचवेळी मागच्याबाजूने दुचाकी आली.
त्यावर दोन जण हेल्मेट घालून बसलेले होते.
त्यांनी त्या महिलेच्या गळ्यात हात टाकला
आणि सोन्याची पोत ओढली.
क्षणार्धातच चेन स्नॅचिंग झाल्याने ती महिला भांबावली.
नंतर तिला लक्षात आले की
६ तोळ्यांची तिची सोन्याची पोत चोरांनी पळवून नेली.
मात्र, ती महिला दुसऱ्या दिवशी
खुप दुःखी झाली.
कारण,
सगळीकडे बातम्या आल्या होत्या की,
वृद्ध महिलेच्या गळ्यातील
सोन्याची पोत चोरांनी लांबवली.
– हसमुख