इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नीचा पतीला प्रश्न
शारदा आणि तिचा पती सुयश
हे दोन्ही सातत्याने भांडत असतात.
एकेदिवशी शारदा सुयशला प्रश्न विचारते
शारदा : बरं मला सांगा तुम्ही मूर्ख आहेत की मी?
सुयश (अतिशय शांतपणे) : प्रिये, सगळ्यांना माहीत आहे की,
तू खूप कुशाग्र बुद्धीची आहेस.
म्हणूनच असे कधीही होऊ शकत नाही की
तू मूर्ख व्यक्तीशी लग्न करशील.
(हे उत्तर ऐकून सुयशचे नाव
आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे)
– हसमुख










