इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
किती दिवस जगू शकतो
(शाळेत शिक्षक शिकवित असतात)
शिक्षक – मुलांनो, मला एका प्रश्नाचे उत्तर द्या
सर्व विद्यार्थी एकाचवेळी – हो, मास्तर. विचारा
शिक्षक – जेवण न करता माणूस किती दिवस जगू शकतो?
तुम्हाला माहित आहे का?
गण्या – मी सांगू सर
शिक्षक – हो हो सांग ना!
गण्या – खुप वर्ष जगू शकेल
शिक्षक – ते कसं काय?
गण्या – सोप्प आहे. फक्त नाश्ता करुन
– हसमुख