इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
काका जेव्हा बँकेत येतात
धनादेश न वटल्याने
संतापलेल्या काकांनी बँक गाठली.
आणि ते मॅनेजरला भेटले…
काका – काय गंमत केली आहे तुम्ही…
शेजारी बँक असूनही १५ दिवस जाले.
अद्याप धनादेश वटलेला नाही.
एवढा वेळ का घेत आहात?
मॅनेजरने शिपायाला पाणी आणण्यास सांगितले.
काका – मला पाणी नको, पैसे हवेत.
मॅनेजर – बघा साहेब, नियम पाळले पाहिजेत.
काका – मला नियम सांगू नका.
अद्याप पैसे कसे नाही मिळाले ते सांगा
मॅनेजर – बरं. कल्पना करा की, तुम्ही बाजारात जात आहात.
वाटेत तुमचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
तर तुमचे कुटुंबिय तुम्हाला घरी आणतील
की त्याच ठिकाणी जाळून टाकतील.
हे ऐकून काकांना थेट पृथ्वी फिरतानाच दिसली
– हसमुख