इंडिया दर्पण – हास्य षटकार – खरं बोलण्याने वाचला मार
(बंटी शाळेतून घरी येतो आणि त्याच्या वडिलांशी बोलत असतो तेव्हा)
बंटी – बाबा, मी आज खरं बोललो.
त्यामुळे मॅडमने मला शिक्षा नाही केली.
बाबा – अरे व्वा. छान. पण, असं काय घडलं नेमकं सांग बरं
बंटी – माझ्या होमवर्कमध्ये खुप चुका होत्या.
त्यामुळे मॅडमने मला मारायला छडी घेतली.
पण, मी खरं खरं सांगून टाकलं की,
हा होमवर्क मी नाही तर बाबांनी करुन दिलाय.
बाबा – मग, मॅडम काय म्हणाल्या?
बंटी – दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा
तुला देऊन काय उपयोग?
– हसमुख