इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
वाहतूक पोलिस आणि पिंट्या
पिंट्या त्याच्या दोन मित्रांना पिक्चर बघण्यासाठी तयार होतो.
एकाच दुचाकीवर हे तिघे बसतात.
पिंट्या भरधाव वेगाने गाडी चालवतो.
एका सिग्नलवर वाहतूक पोलिस असतो.
तो शिटी वाजवून पिंट्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो.
पण, पिंट्या आणखी जोरात गाडी चालवतो.
याची दखल घेत वाहतूक पोलिस त्यांचा पाठलाग करतो.
अखेर पोलिस त्यांना पकडतो.
पोलिस – काय रे. बहिरा आहेस का
पिंट्या – नाही साहेब.
पोलिस – अरे केव्हाचा शिटी वाजवतोय
पिंट्या – हो साहेब
पोलिस – मग, गाडी का नाही थांबवलीस
पिंट्या – अहो साहेब, आधीच आम्ही तिघे आहोत.
आता तुम्हाला कुठे बसवणार
– हसमुख