इंडिया दर्पण – हास्य षटकार – टिंग्याची मध्यरात्रीची कमाल
(टिंग्या आणि त्याची आई हे दोन्ही बोलत असतात)
टिंग्याला रात्री झोपेतून उठून लघवी करायला
जाण्याची सवय असते. टिंग्या सकाळी उठला आणि
आईला म्हणाला, आई रात्री मी जेव्हा झोपेतून उठलो आणि
लघवी करायला गेलो ना तेव्हा टॉयलेटचा दरवाजा उघडला.
आणि चमत्कारच झाला. अचानक लाईट लागले
आणि आतून थंडगार हवा येऊ लागली.
आईने ते ऐकून कपाळावर हात मारला
आणि ती जोरात ओरडली, मेल्या टिंग्या..
तू रात्री टॉयलेटमध्ये न जाता
फ्रिजमध्ये लघवी करुन आलास वाटतं.
मर तिकडं…
– हसमुख