इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
ती पहिल्यांदाच बोलली
(चिंटू आणि मिंटू हे कॉलेजमध्ये भेटतात.)
मिंटू अतिशय आनंदी असतो.
चिंटू – का रे काय झाले आज एवढा आनंदी का आहेस
मिंटू – आज पहिल्यांदा एक मुलगी माझ्याशी सिटी बसमध्ये बोलली
चिंटू – व्वा. व्वा. भारीच. काय म्हणाली ती
मिंटू – मी बसलो होतो. ती म्हणाली, उठ, ही महिलेची सीट आहे
– हसमुख