इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तिसरे महायुद्ध झालं तर
(शाळेत झांबरे मास्तर शिकवित असतात. त्याचवेळी ते विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतात)
झांबरे मास्तर – मुलांनो, इकडे लक्ष द्या.
मी काय विचारतोय,
त्याचे उत्तर व्यवस्थित द्या..
सर्व विद्यार्थी – हो मास्तर (जोरदार गलका होता)
झांबरे मास्तर – अरे गप्प बसा रे आणि प्रश्न ऐका.
समजा तिसरं महायुद्ध झालं
तर काय होईल….
टग्या (विद्यार्थी) – मास्तर फार फार मोठा
परिणाम होईल
झांबरे मास्तर – सांगा बरं.
काय काय मोठे
परिणाम होतील.
कोण सांगतंय…
वश्या (विद्यार्थी) – हातवर करुन सांगतो –
मास्तर, फार काही नाही.
कारण, इतिहासाच्या पुस्तकात
आणखी एक नवा धडा येईल.
पण, वाईट हे की
आम्हाला त्या नव्या धड्याचाही
अभ्यास करावा लागेल.
(मास्तर हे ऐकून ताडकन शिक्षकांच्या खोलीत निघून गेले)
– हसमुख