इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षकांचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे उत्तर
(मराठीच्या व्याकरणाचे शिक्षक वर्गात शिकवित असतात तेव्हा)
मराठे गुरुजी – आज आपल्याला कर्ता याविषयाची उजळणी करायची आहे.
सर्व विद्यार्थी – हो मास्तर!
मराठे गुरुजी – मी फळ्यावर काय लिहीतो त्याकडे लक्ष द्या..
सर्व विद्यार्थी – हो (मोठ्या आवाजात)
गुरुजी फळ्यावर लिहीतात – ‘खुप प्रयत्न करुनही सदाभाऊ मरण पावले’
मराठे गुरुजी – मुलांनो, मला सांगा बरं,
या वाक्यात कर्ता कोण आहे?
(काही विद्यार्थी हात वर करतात)
मराठे गुरुजी – गण्या, तू सांग बरं
गण्या – (खूप विचार करुन) – परमेश्वर
– हसमुख