इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षक, पिंट्या आणि होमवर्क
शाळेत शिक्षक गणित शिकवित असतात.
तेवढ्यात त्यांना आठवण येते की त्यांनी विद्यार्थ्यांना होमवर्क दिला आहे.
ते सर्वांना म्हणतात, दाखवा बरं कुणी कुणी होमवर्क केला आहे.
पिंट्याने केलेला नसतो तेव्हा
शिक्षक – बाळा, होमवर्क का नाही केलास?
पिंट्या – सर, जेव्हा मी होमवर्क करायला बसलो
तेव्हा नेमकी लाईट गेली…
शिक्षक – अरे, मग लाईट आल्यावर का नाही केलास?
पिंट्या – होमवर्क करायला बसलो
आणि पुन्हा लाईट गेली तर..
उगाच माझ्यामुळे लाईट जायला नको,
म्हणून मी नाही केला
– हसमुख