इंडिया दर्पण – हास्य षटकार – …म्हणून मास्तर भजीच्या शोधात निघून गेले
(शाळेत लचके मास्तर शिकवित असतात तेव्हा)
लचके मास्तर – पोरांनो, इकडे लक्ष द्या बरं
सर्व विद्यार्थी – हो, मास्तर
लचके मास्तर – पावसाळ्यामध्ये पचायला हलके असे पदार्थ खायला हवेत.
तुम्हाला माहित आहेत का, असे पदार्थ कोणते,
कोण सांगेल बरं
(पिंकी आणि पिंट्या दोघेही हात वर करतात)
लचके मास्तर – पिंकी, आधी तू सांग बरं. त्यानंतर पिंट्या तू सांग
पिंकी – मास्तर, भजी
लचके मास्तर – अगं कसं काय. पिंट्या तू सांग बरं
पिंट्या – मास्तर, भजीच
लचके मास्तर – अरे कसं काय
पिंट्या आणि पिंकी (दोघे एकाचवेळी) – मास्तर, तेल हे पाण्यावर तरंगतं.
कारण, तेल हे हलकं आहे. आणि तेलावर भजी तरंगते.
त्यामुळे भजी ही सर्वात हलकी आहे.
म्हणूनच पावसाळ्यात भजी खायला हवी
(हे उत्तर ऐकून मास्तरच भजीच्या शोधात निघून गेले)
– हसमुख