इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनूचे लग्न
बरेच वय झाले तरी लग्न न झाल्यामुळे
सोनू खूप अस्वस्थ होता.
प्रत्येक वेळी लग्न मोडले.
अनेक पंडितांना विचारले
पण काही उपाय सापडला नाही.
बिचारा एक दिवस वैतागून
लग्नमंडपात पोहोचला…
लग्न करणाऱ्या पंडितजींना म्हणाला – पंडितजी माझे लग्न होत नाहीय. मला काही तरी उपाय सांगा
पंडितजी म्हणाले – सदैव आनंदी राहण्याचे आशीर्वाद घेणे बंद कर बेटा..!
अन्यथा तू आयुष्यभर कुवाराच राहशील.
– हसमुख