इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनू, परीक्षा आणि अभ्यास
(आजोबा त्याच्या नातवा सोबत बोलत असतात तेव्हा)
आजोबा – सोनू बेटा, परीक्षेची तयारी झाली का?
सोनू – हो आजोबा, सर्व तयारी झाली.
पॅड घेतला, दोन पेन घेतलेत.
कंपास, हॉल तिकीट घेतले.
युनिफर्मही इस्त्री करुन घेतलाय
आजोबा – अरे व्वा. पण, आजच्या पेपरचा
अभ्यास झालाय का?
सोनू – नाही आजोबा.
तेवढा मात्र राहिला आहे
– हसमुख